सांगलीचे उद्योजक रवींद्रसिंह बेंडखळे यांची अध्यक्षपदी निवड
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपाशीर्वादाने मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कार्वे एमआयडीसी विटा सांगलीच्या अध्यक्षपदी रवींद्रसिंह बेंडखळे यांची निवड झाली आहे व उपाध्यक्षपदी विशाल लकडे यांची निवड झाली आहे.
सांगलीचे रवींद्र सिंह हे अतिशय कष्टळू व प्रामाणिक व सर्व गुणसंपन्न व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे ते नेहमी म्हणत असतात काम कोणतेही असो छोटे किंवा मोठे नसते तर काम हे कामच असते.
रवींद्र सिंह यांनी सुरुवातीला सांगलीमध्ये छोटेसे किरण दुकान चालू केले होते काम हीच पूजा समजून त्यांनी दुकान सु व्यवस्थित चालवण्याचा काम केले होते यातूनच त्यांनी विटा शहरामध्ये एक फॅक्टरी सुरू केली या फॅक्टरीमध्ये अहोरात्र काम करून ही फॅक्टरी नावारुपास आणली. आपली फॅक्टरी संभाळत असताना एमआयडीसी कर्वे मधील बऱ्याच उद्योजकाला सतत मदत करत असत. सर्वांच्या बरोबर मिळून मिसळून वागत असत.
एमआयडीसी कार्वे या ठिकाणी जे उद्योजक आहेत त्यांनी एक मीटिंग घेतली व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कार्वे एमआयडीसी विटा जिल्हा सांगलीच्या अध्यक्षपदी रवींद्र सिंह बेंडखळे यांची निवड केली व उपाध्यक्षपदी विशाल लकडे यांची निवड केली यावेळी उपस्थित उद्योजक प्रकाश मराठे, संतोष जोगड, राज जैन, सूज बुद्धी दिन तांबोळी, विनोद लगारे, अबीद शेख, अजय देशपांडे, धनंजय माळी, श्रीकांत कदम ,हेमंत खंडागळे, राहुल ढोपे पाटील इत्यादी उपस्थित होते.
या निवडीमुळे रवींद्र सिंह बेंडखळे व विशाल लकडे यांचे विटा शहर व सांगलीत कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच व अशोक सिंह मासाळ यांच्याकडूनही रवींद्र सिंह बेंडखळे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.