माध्यमिक शिक्षण विभातील प्रलंबित फाईलबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
अशोक मासाळ / सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डीसीपीएस/एनपीएस संघर्ष समिती जिल्हा सांगलीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित फाईलीबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष लाखन मकानदार, मनपा प्रमुख कलीम नदाफ, राज्य सहसचिव धनराज ठोंबरे, विभागीय अध्यक्ष नितीन जाधव, जिल्हा सदस्य निरंजन राजमाने, कवठेमहंकाळ तालुका अध्यक्ष नाना शेजाळ, पलूस तालुका अध्यक्ष समीर मुल्ला, मनीष वसावे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.