"मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला नव्हता".. असं का म्हणाले फडणवीस ?

"मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला नव्हता".. असं का म्हणाले फडणवीस ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली. बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावावेळी नार्वेकरांचे कौतुक केले.  मी पुन्हा येईन, असं तुम्ही म्हणाला नव्हतात. पण तरीही आपण परत आलात, याचा आनंद असल्याचं फडणवीस म्हणाले. नाना पटोलेंचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

काय म्हणाले फडणवीस ?

विधानसभेचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील तमाम १२ कोटी जनतेच्या वतीने राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सातत्याने विरोधीपक्ष नेत्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा विरोधीपक्षाने राखली आहे. याचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल विरोधीपक्षाच्या सर्व सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं फडणवीस म्हणाले.

मी पुन्हा येईन, असं तुम्ही म्हणाला नव्हतात. पण तरीही आपण परत आलात, याचा मला मनापासून आनंद आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना त्यापैकी एक वकील होता. आता तुमच्यामुळे ५०-५० टक्के झालं आहे. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला आणि न्याय देण्याचं काम तुम्ही कराल, यात शंका नसल्याचंही फडणवीस म्हणाले.