मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेला स्थगिती
मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले होते. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
त्यामुळे निवडणुका होईपर्यंत पुढील हप्ते मिळणार नाहीत. निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना तात्पुरत्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागाने योजनेसाठी निधी वितरण थांबवले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते एकत्र देण्यात आले होते, परंतु आता डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.