यशस्वी होण्यासाठी कौशल्ये आत्मसात करा: संदीप पाटील

यशस्वी होण्यासाठी कौशल्ये आत्मसात करा: संदीप पाटील

वारणानगर (प्रतिनिधी) : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त लेखी गुणांकडे लक्ष न देता प्रात्यक्षिक व कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्या असे मत संदीप पाटील, नॅशनल सायबर टेक लीगल एक्सपर्ट, यांनी व्यक्त केले. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालय आयोजित अभियांत्रिकी एमबीए एमसीए मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना  संदीप पाटील म्हणाले,  यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे केमिस्ट्री विषयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सायबर सिक्युरिटी मध्ये भारतात पहिली पीएचडी करत असल्याचे नमूद केले. त्यांनी सहकार महर्षी श्री तात्यासाहेब कोरे यांचे उदाहरण देऊन पटवून सांगितले की कमी शिक्षण असून सुद्धा यशाची शिखरे गाठता येतात.

सन  २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष विभागामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने पूर्ण परिसर बहरून गेला. कार्यक्रमाच्या सुरवातीला गेल्या वर्षातील परीक्षेत झळकलेल्या ०५ गुणवंतांचा आणि नवीन प्रवेश घेतलेल्या सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काही पालकांनी महाविद्यालयाचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. विनयरावजी कोरे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी राजेश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, लायरा नेटवर्क एशिया यांनी सांगितले की भारताचे यूपीआय सेवा फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करू शकलो याचे सगळे श्रेय तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळालेल्या शिक्षणाला व  उपक्रमाना दिले. राजेश देसाई हे सध्या एक नावाजलेले यशस्वी उद्योजक असून त्यांनी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर येथून इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून १९९३ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, यांनी वारणा विद्यापीठाची व भविष्यात होऊ घातलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच तसेच हे विद्यापीठ स्टेट पब्लिक क्लस्टर युनिव्हर्सिटी असून सर्व शासकीय नियमानुसार चालणार असल्याची सांगितले. 

प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने यांनी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रॅम चे महत्त्व सांगितले व महाविद्यालयातील इतर सेल विषयी माहिती दिली. जोशी झांफला कंपनीचे पीएमओ अग्रण्या झंपाला यांनीही मार्गदर्शन केले. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांनी आयडिया लॅब, ॲपल ट्रेनिंग सेंटर व महाविद्यालयात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या  उपक्रमांची माहिती पुरवली. विभाग प्रमुख डॉ. पी . जे.पाटील यांनी  विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  ऍडमिशन इन्चार्ज, डॉ. ए. व्ही. पाटील यांनी प्रवेशाशी निगडीत औपचारिक गोष्टीची माहिती करून दिली. 

डॉ. मार्क मोनिस,  प्रा. गणेश कांबळे व कृष्णात पाटील यांनी मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.व्ही. डी.पाटील यांनी आभार मानले. यावेळी वारणा विद्यापीठाचे डायरेक्टर्स, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.