HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

"यामागे सरकारचा डाव..", काय म्हणाले मनोज जरांगे?

"यामागे सरकारचा डाव..", काय म्हणाले मनोज जरांगे?

जालना (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणून जरांगे म्हणाले, एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत, दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय.

मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणासाठी मोठा लढा

मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली असून त्यावर ते ठाम आहेत. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार गोड बोलून माझा काटा काढू पाहतंय असा आरोप केलाय.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“अद्याप दोन ते तीन दिवसांत कुठलाही संवाद सरकारतर्फे झालेला नाही. कुणी संपर्कही केलेला नाही. बेमुदत उपोषण सुरु आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, लाडीगोडी लावून बोलत आहेत. गोड बोलून काटा काढायचा असा प्रयत्न असल्याचं दिसतं आहे. एकीकडून म्हणायाचं तातडीने मार्ग काढतो. बेमुदत उपोषण सुरु आहे तरीही पाच दिवस होऊ द्यायचे. यामागे सरकारचा डाव असू शकतो.” असाही आरोप मनोज जरांगेंनी केलाय.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.