युरेका जिज्ञासा स्पर्धा व एलजीच्या नियोजन पद्धतीमध्ये साम्य - सूचित हेडा

कोल्हापूर - युरेका जिज्ञासा स्पर्धा व एलजीच्या नियोजन पद्धतीमध्ये साम्य असल्याचे मत डॉ. सूचित हेडा, सीनियर जनरल मॅनेजर, एलजी इलेक्ट्रॉनिक्स पुणे यांनी व्यक्त केले. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील युरेका जिज्ञासा २के २५ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सर्व समावेशक शिक्षण, प्रचंड कष्ट करण्याची व नवीन शिकण्याची भूक, परिस्थितीशी जुळवून घेण्याचे क्षमता अभियंताकडे असावी असा सल्ला त्यांनी दिला.
युरेका जिज्ञासा स्पर्धेसाठी साठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व एनआयटी अशा नामांकित संस्थांमधून ११०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना दोन लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. डॉ. आर. डी. खराडकर इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आयईटीई )विषयी माहिती सांगितली.
स्पर्धेच्या नियोजनासाठी वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी . टी. साळोखे, हेमंत जाधव, मकरंद गाडवे, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, डॉ. एस. टी. जाधव, प्रा. शिवानंद, डॉ. पी. बी. डेहनकर आदी उपस्थित होते.