कै. रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदिर कसबा ठाणे पन्हाळा शाळेत प्रवेशोत्सव साजरा

कै. रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदिर कसबा ठाणे पन्हाळा शाळेत प्रवेशोत्सव साजरा

पन्हाळा प्रतिनिधी:- आशिष पाटील 

आज कै. रावजी महातू पाटील कुमार विद्या मंदिर कसबा ठाणे शाळेत गुढीपाडव्याच्या शुभ दिनी इयत्ता पहिलीसाठी नवीन मुलांचा प्रवेशोत्सव घेण्यात आला.

       या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी, कै. रावजी महातू पाटील कुमार वि. मं. कसबा ठाणे शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी तसेच शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. विजय संकपाळ उपस्थित होते. सरस्वती फोटो पूजन श्री. विजय संकपाळ यांचे हस्ते संपन्न झाले.

पालकवर्गातून श्री. नामदेव सदाशिव मेडसिंग, श्री दिपक रंगराव पाटील, श्री. मानसिंग गणपती पाटील, श्री.धीरज हंबीरराव पाटील, श्री. बाजीराव दत्तात्रय कांबळे, श्री आशिष गंगाराम पाटील, श्री आनंदा कृष्णा कांबळे हे उपस्थित होते.

 इयत्ता पहिलीतुन कु. श्रीतेज निलेश मेडसिंग, कु.आदित्य दिपक पाटील,कु.स्वराज मनसिंग पाटील,कु. कार्तिक धीरज पाटील,कु. यशवर्धन बाजीराव कांबळे,कु. जयवर्धन बाजीराव कांबळे, कु.ऋग्वेद आशिष पाटील,कु.सुदर्शन आनंदा कांबळे

  या विद्यार्थ्यांनी पहिलीसाठी शाळेत प्रवेश घेतला. उपस्थित सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 या कार्यक्रमावेळी माननीय मुख्याध्यापक श्री. हरी बाजीराव पाटील, पदवीधर शिक्षक श्री.संदीप कुंभार, अध्यापक श्री. सर्जेराव धुळाप्पा पाटील, अध्यापक श्री. रणजीत रघुनाथ सूर्यवंशी सर, तसेच पालक वर्गातून श्री.आशिष गंगाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.दरम्यान जागतिक जल दिनाचे औचित्य साधून श्री. संदीप कुंभार सरांनी उपस्थित सर्वांना जल प्रतिज्ञा देण्यात आली.

  या कार्यक्रमाचे निवेदन श्री. रणजीत सूर्यवंशी सर तसेच आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री.हरी बाजीराव पाटील सर यांनी के