राजनंदिनीच्या ग्रंथ भांडारास उत्स्फूर्त प्रतिसाद

राजनंदिनीच्या ग्रंथ भांडारास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी - साने गुरुजी वसाहत परिसरातील श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, तेजस मुक्त विद्यालय आणि सन्मित्र विद्यालय या देशमुख शिक्षण समूहातील शाळांचा क्रीडा महोत्सव आणि स्नेहसंमेलन सुरू आहे. महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित खाद्य महोत्सवात राजनंदिनी ग्रंथ भांडार स्टॉलने वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. 

       तेजस मुक्त विद्यालयामध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या राजनंदिनी दिग्विजय पवार हीने चक्क पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारला होता. या स्टॉलवर अभिनव बौद्धिक खाद्य उपक्रम, येथे बौद्धिक खाद्य मिळेल, अल्पदरात बहुगुणी पुस्तकरुपी कॅडबरी, पुस्तकरुपी कॅडबरी फक्त १० रुपये, पुस्तकरुपी मोठी कॅडबरी घ्या, फक्त 30 रुपये असे बोर्ड झळकत होते. विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकांच्या आणि सुजाण पालकांच्या प्रोत्साहनाने स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेली एकूण १०२ पुस्तके अगदी अडीच तासांच्या अवधीत विकली गेली. विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये राजर्षी शाहू, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, उद्योगजगतेतील नवरत्ने, शिक्षण-क्षेत्रातील नवदुर्गा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, थोरले माधवराव पेशवे, यशाचं गमक, या पुस्तकांचा समावेश आहे. राजनंदिनीस संस्थेच्या श्रीमती सुमनताई वसंतराव देशमुख, शारंगधर देशमुख, तेजसच्या मुख्याध्यापिका सौ. एस.पी.साळोखे, वर्गशिक्षक सुशांत इंगळे आणि सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले. तिची आई सौ श्रद्धा पवार, वडील प्रा.डॉ. दिग्विजय पवार, आजोबा डॉ.जे.के पवार यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र शासनातर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सुरू आहे. अशा वेळी कु.राजीनांदिनीने उभारलेल्या अभिनव ग्रंथ भांडाराचे सर्वांनीच कौतुक केले.