राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ना. भास्करराव जाधव यांची 158 वी जयंती उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को - ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ना. भास्करराव जाधव यांची 158 वी जयंती उत्साहात पार पडली. ना. भास्करराव जाधव यांच्या पुतळ्याला बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील (एम्.एस्) व संचालकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
ना. भास्करराव जाधव यांचा आदर्श व दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत कामकाज करीत असून बँक " 109 व्या" वर्षात पदार्पण करणार आहे. ना. भास्करराव जाधव यांच्या आर्थिक साक्षरतेच्या विचारांचा ठेवा जतन करुन, बदलत्या आधुनिक बँकिंग कामकाजाचा अवलंब करीत बँकेचे प्रगतीसाठी यापुढेही काम करीत राहणार असल्याचे यावेळी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष अरविंद आयरे, संचालक सर्वश्री रविंद्र पंदारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दिपक पाटील, गणपत भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे यांच्यासह सभासद , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.