राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत हातगाड्या, शेड व स्टँड बोर्ड जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज राजारामपुरी मेन रोडवरील जनता बाजार चौक ते रेल्वे फाटक रोड या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 10 हातगाड्या, 2 पत्र्याचे शेड/छपऱ्या, 17 स्टँड बोर्ड विना परवाना अनधिकृत स्वरूपात आढळून आले. यामध्ये रेल्वे फाटक परिसरातील 4 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तर 6 हातगाड्या फेरीवाल्यांनी स्वतः हून हटविल्या.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत पुढील काळात देखील शहरातील अनधिकृत फेरीवाले, दुकानदारांकडून रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या शेड्स व स्टँड बोर्ड यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवालयांनी आपली अतिक्रमण हटवून सहकार्य करावे. दुकानाबाहेरील पार्किंग जागांवर स्टँड बोर्ड लावू नयेत, अन्यथा ते जप्त करण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, राजारामपुरी व गांधी मैदान वॉर्डातील कर्मचारी व पोलिस कर्मचा-यांनी केली.