राधानगरीतील 168 शेतकऱ्यांना स्वयंघोषणापत्राचे वाटप

विजय बकरे / राधानगरी, प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी राधानगरी ग्रामपंचायतने विशेष शिबीर आयोजित केले होते. या अंतर्गत राधानगरीतील 168 शेतकऱ्यांना खरीप हंगामातील भात पिकासाठी पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्र सरपंच सविता भाटळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
तसेच पीक विमा अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी आघाडी प्रमुख राजेंद्र भाटळे, उपसरपंच डी. एस. कांबळे, तलाठी मनोज भोजे, ग्रामविकास अधिकारी महादेव गुरव, विमा कंपनी प्रतिनिधी प्रकाश वाघरे, संग्राम वाघरे, विकास पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.