आणाजे येथे बंडा बाळा पाटील यांच्या 31 व्या स्मृतीदिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

आणाजे येथे बंडा बाळा पाटील यांच्या 31 व्या स्मृतीदिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

आणाजे येथे बंडा बाळा पाटील यांच्या 31 व्या स्मृतीदिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न 

गुडाळ/ वार्ताहर संभाजी कांबळे

   आणाजे ता. राधानगरी येथील भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती कै. बंडा बाळा पाटील यांच्या एकतिसाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

    प्रारंभी प्रतिमा पूजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल असा, वक्तृत्व स्पर्धा-मोठा गट: राजवर्धन दीपक भोपळे (प्रथम), प्रमिला प्रदीप मोरे (द्वितीय), समीक्षा बाजीराव पाटील (तृतीय), अनुष्का दत्तात्रय कदम (उत्तेजनार्थ). लहान गट- निहाल रवींद्र शिंदे (प्रथम), गौरी दीपक चौगले (द्वितीय), अनुष्का रवींद्र जाधव (तृतीय), वनश्री विजय कोपार्डेकर (उत्तेजनार्थ).

  रांगोळी स्पर्धा-श्रुतिका भैरवनाथ जाधव (प्रथम), वर्षा अभिजीत पाटील (द्वितीय), तनुजा सागर जाधव (तृतीय).

   बैलगाडी शर्यत- अविष्कार वडाम जोगेवाडी (प्रथम), आबा प्रेमी आणाजे (द्वितीय), ओंकार परीट आणाजे (तृतीय).

  होम मिनिस्टर स्पर्धा- ऋतुजा सुहास जाधव (प्रथम), माधुरी दत्तात्रय जाधव (द्वितीय), माधुरी अशोक पाटील (तृतीय).

  स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र चौगले, विश्वास आरडे, संभाजी पाटील संजय तिबिले यांनी केले. स्वागत बँक निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले. यावेळी भोगावती व बिद्री परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,  स्थानिक संस्थांची पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक डी. बी. पाटील यांनी मानले.