राधानगरी येथे महसूल सप्ताहनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर

राधानगरी येथे महसूल सप्ताहनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर

विजय बकरे / राधानगरी, प्रतिनिधी 

राधानगरी येथे महसूल सप्ताहनिमित्त आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 22 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, तर 60 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचा लाभ घेतल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. या पार्श्वभुमीवर आज तहसील कार्यालयामध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये सहभाग घेऊन शासनाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल महसूल कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन, असे सहकार्य करत रहावे असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमास राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार ऋतुराज निकम, सुबोध वायंगणकर, मंडळ अधिकारी सुंदर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे तसेच तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.