राष्ट्रपती यांचा कोल्हापूर दौरा पुढे ढकलला
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थित वारणानगर इथं होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिनांक २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौ-यावर येणारं होत्या. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय हे सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राष्ट्रपतींचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.