राष्ट्रीय पातळीवरील हॅकफेस्ट २.० स्पर्धेत शरद इन्स्टिट्युटला यश थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग सिस्टीम प्रकल्प

यड्राव प्रतिनिधी - येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथे झालेल्या सीएमआर हॅकफेस्ट २.० या राष्ट्रीय स्तरावरीस प्रोजेक्ट स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकाविला.
हैद्राबाद येथील सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा झाल्या. यामध्ये देशभरातून १७०० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. त्यामधील २५० पेक्षा अधिक संघ अंतिम स्पर्धेसाठी निवडले गेले होते. त्यामध्य़े शरद इन्स्टिट्युटच्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी चौथा क्रमांक मिळविला.
स्पर्धेत पार्श्वनाथ गिरमल, यशवर्धन पाटील, रोहन शिंगे (इलेक्टॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), यशोदिपसिंग रजपूत (आर्टिफिशल इंटेलिजेन्ट अॅण्ड डाटा सायन्स) या विभागातील विद्यार्थ्यांनी ‘थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग सिस्टीम फॉर अॅन इलेक्टीक व्हेइकल फॉर थर्मल मॅनेजमेंट’ हा प्रोजेक्ट सादर केला.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयन बॅटरी कूलिंगची समस्या सोडवण्यासाठी एक बॅटरी कूलिंग सिस्टम विद्यार्थ्यांनी निर्माण केले आहे. ही प्रणाली रिअल-टाइम तापमान सेन्सरने बॅटरीचे तापमानाचे सतत निरीक्षण करते आणि तापमान सेन्सर वापरून संभाव्य अतिउष्णतेचा अंदाज लावते. त्यानुसार ह्या सिस्टिममुळे गरम झालेल्या बॅटरीचे जलद आणि कार्यक्षम कूलिंग होते.
विद्यार्थ्यांना प्रा. धनश्री बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक, सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.