HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

भूगोलाच्या क्षेत्रीय अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य: डॉ. सचिन पन्हाळकर

भूगोलाच्या क्षेत्रीय अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य: डॉ. सचिन पन्हाळकर

कोल्हापूर : भूगोलाच्या अभ्यासकांच्या क्षेत्रीय अभ्यासात जी.आय.एस. आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अनिवार्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले.

विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या वतीने भौगोलिक माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीशीलता या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील न्यू कॉलेज, राजाराम महाविद्यालय, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर) आणि श्री विजयसिंह यादव महाविद्यालय (पेठ वडगाव) या महाविद्यालयांच्या निवडक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना आधुनिक जी.आय.एस. तंत्रज्ञानड्रोन तंत्रज्ञान आणि थ्रीडी- मॅपिंग आदी अत्याधुनिक संकल्पनांचा प्रात्यक्षिकांसह परिचय करून देणे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

डॉ. पन्हाळकर उद्घाटन सत्रात म्हणाले की, भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी या आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञानच भविष्यातील स्पर्धात्मक जगात अधिक संधी मिळवून देईल. त्या दृष्टीने सातत्याने नवतंत्रज्ञान आत्मसात करीत राहिले पाहिजे.

उद्घाटन सत्रात समन्वयक डॉ. अभिजीत पाटील यांनी जिओस्पॅशियल तंत्रज्ञानाच्या प्रभाव आणि संधी याविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी भूगोल अधिविभागातील जीआयएस प्रयोगशाळेत प्रत्यक्ष हाताळणी सत्र घेण्यात आले. यानंतर दिवसभर विविध सत्रांत वेब-जीआयएस, थ्रीडी-मॅपिंग, ड्रेन तंत्रज्ञान, थ्रीडी मॉडेलिंग, याविषयी डॉ. अभिजीत पाटील, डॉ. सुधीर पोवार, ओंकार बिद्रे यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रात डॉराजेखान शिकलगारडॉराजाराम पाटीलडॉदिनेश भंडारेडॉएसएसटिकेकर आणि डॉएनडीकाशीद-पाटील यांनी अनुभव व्यक्त केले.

 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.