रोटरी सेंट्रल आणि सोशल कनेक्टतर्फे देवी पार्वती हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्रदान

रोटरी सेंट्रल आणि सोशल कनेक्टतर्फे देवी पार्वती हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्रदान

वडणगे (प्रतिनिधी) :  येथील देवी पार्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूलसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि सोशल कनेक्ट फाउंडेशन यांच्यावतीने वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट संजय भगत सोशल कनेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महादेव नरके, उद्योजक नरेश शिंगाडे ,मुख्याध्यापक आर.बी.देवणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यामुळे शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.

 यावेळी बोलताना संजय भगत म्हणाले, समाजाच्या हितासाठी रोटरी सेंट्रल तर्फे सातत्याने उपक्रम घेतले जातात.विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट केल्याचा आनंद आहे.

यावेळी बोलताना डॉ. महादेव नरके म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून सोशल कनेक्टने  या उपक्रमात रोटरी सेंट्रल बरोबर सहभाग घेतला आहे. 

मुख्याध्यापक आर.बी.देवणे यांनी सांगीतले की, रोटरी आणि सोशल कनेक्ट हा उपक्रम केल्याने विद्यार्थ्याचे आरोग्य  चांगले राहण्यास मदत होईल .

यावेळी स्वागत के.व्ही. इरूडकर यांनी केले तर आभार डी.एम.साखळकर यांनी मानले.यावेळी  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.