बिबट्या सदृश्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ बकरी ठार

वाळवा (प्रतिनिधी) : गोटखिंडी तालुका वाळवा येथील रामचंद्र तानाजी टेंबे यांच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्या सदृश्य वन्य प्राण्यांच्या कळपाने केलेल्या हल्यात १५ बकऱ्या मृत्यूमुखी पडली आहेत . या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ रामचंद्र तानाजी टिंबे रा. गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली यांनी जास्त आपला बकऱ्यांचा कळप पाऊस जास्त असल्यामुळे नाईक वस्ती शेजारी असलेल्या शेडमध्ये रात्री बंदिस्त करून ठेवला असताना रविवार दि. ८/९/२०२४ पहाटे तीन च्या दरम्यान बिबट्या सदृश्य वन्य प्राण्यांनी मेंढरांच्या कळपावर तारेच्या जाळी उचकटून हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळ रामचंद्र टिंबे यांची १४ लहान कोकरे व १ गाभण मेंढीस ठार केले या घटनेचे माहिती मेंढपाळ रामचंद्र टिंबे व विक्रम टिंबे यांनी तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच संजय वाघमोडे साहेब यांनी वनरक्षक भिवा कोळेकर यांना कळवून घटना स्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली.तसेच मेंढपाळांच्या मदतीसाठी नागाव शाखेचे शाखाध्यक्ष प्रमोद शिसाळ यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह घटनास्थळी हजर राहून मेंढपाळांना धीर देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक भिवा कोळेकर वन मंजूर निवास उघडे विक्रम टिंबे धोंडीराम मदने प्राणिमित्र घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर वंजारी यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत मेंढ्यांचे शव- विच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरात शेतकरी व पशुपालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत मेंढपाळ रामचंद्र टिंबे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
घटनास्थळी सरपंच दिलीप पाटील डेप्युटी सरपंच प्रताप थोरात पोलीस पाटील तसेच वकील कोळेकर देवाप्पा पादरे, यशवंत क्रांती च्या नागाव शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.