HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांना "समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांना "समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित

हातकणंगले (प्रतिनिधी) : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट व्ही. गिरी यांना २५ ऑगस्ट रोजी दशनाम गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर यांचा "समाजभूषण पुरस्कार  आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने दशनाम गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने एक मानाचा मानला जाणारा “समाजभूषण पुरस्कार” डॉ. विराट व्ही. गिरी यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ, मानपत्र, हे होते.  

डॉ. विराट व्ही गिरी यांचे शिक्षण एम-टेक कॉम्प्युटर, भारती विद्यापीठ पुणे, पीएचडी व्हीटीयु विद्यापीठ बेळगाव येथे पूर्ण झाली असून संजय घोडावत पॉलीटेक्निक-इन्स्टिट्यूट सलग बारा वर्षे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. करियर व व्यक्तिमत्व विकास दहावी आणि बारावीनंतर काय, करिअर वाटा, स्पर्धा परीक्षेमधील संधी व आव्हाने, अध्ययन व अध्यापन कौशल्य, संस्कार रुपी शिक्षण, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्थापन कौशल्य, शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थापन, सकारात्मक अभिरुद्धी विद्यार्थी व पालक अनेक विषयावर प्रबोधनात्मक व प्रोत्सानात्मक एक हजारांहून अधिक व्याख्याने डॉ. गिरी यांनी दिलेली आहेत. डॉ. गिरी यांचे सहा पुस्तके प्रकाशित झालेले असून. लोकप्रिय वर्तमानपत्रांमध्ये करिअर विषयावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. नवोदय विद्यालयाचे गुणवान विद्यार्थी म्हणून डॉ. गिरी यांचे नाव घेतले जाते. विविध उल्लेखनीय कामकाजामध्ये या अगोदर विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये डॉ. सुजित मिंचेकर फाउंडेशन ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’, पाणी फाउंडेशन कडून ‘जलरत्न पुरस्कार’ स्वाभिमानी शिक्षक संघाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आयएसटीस्कूल कडून ‘बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार’ टुडे रिसर्च अँड रेटिंग नवी दिल्ली या संस्थेमार्फत ‘बेस्ट अपकमिंग पॉलिटेक्निक इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

"समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजय घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, यांनी डॉक्टर गिरी यांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.