HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

लोकसंख्या नियत्रंणासाठी प्रसार व प्रचार करण सर्वांच कर्तव्य - डॉ. राजेश गायकवाड

लोकसंख्या नियत्रंणासाठी प्रसार व प्रचार करण सर्वांच कर्तव्य - डॉ. राजेश गायकवाड

कोल्हापूर (प्रतिनिधी) :   लोकसंख्या नियत्रंणासाठी प्रसार व प्रचार करण सर्वांच कर्तव्य तरच आपली लोकसंख्या नियंत्रणात येईल असे प्रतिपादन डॉ. राजेश गायकवाड यांनी जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम प्रसंगी केले. 

 ११ जुलै २०२४ जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभाग यांचे मार्फत जागतिक लोकसंख्या दिन साजरा करणेत आला. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन व प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. 

नियोजनाच्या विविध पध्दतींचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करुन राज्यामध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ११ जुलै हा एक दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करावयाच्या ऐवजी यावर्षीही दोन टप्प्यात साजरा करावयाचा आहे. यानुसार दांपत्य संपर्क पंधरवडा २७ जून ते १० जुलै २०२४ या कालावधीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्व पटवून देण्याकरिता समाजात जनजागृती व संवेदीकरण करण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहेअसे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेएन यांनी सांगितले.

   दांपत्य संपर्क पंधरवडा संकल्पना व अनुषंगिकने कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पध्दती व सेवा याबाबतच्या माहितीचा समाजात प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रा आ केंद्र स्तरावर आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या बैठका घेऊन व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करणेत आलेली आहे.कार्यक्षेत्रातील जननक्षम जोडप्यांच्या बैठका घेऊन दोन बालकांच्या जन्मामध्ये पुरेसे अंतर, प्रसुती पश्चात / गर्भपात पश्चात कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब व कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग याबाबींचा प्रामुख्याने प्रचार व प्रसार करणेत आला.

  यानिमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन कोल्हापूर जिल्हयातील एकूण ७६ प्रा आ केंद्रे व ४१३ उपकेंद्रे तसेच सर्व उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांचेमार्फत संपूर्ण जिल्हयामध्ये सदर कार्यक्रम राबविला जात आहे, लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २७ जुलै २०२४ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृह कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, जिल्हा क्षयरोग केंद्र वैदयकीय अधिकारी डॉ. परवेझ पटेल, जिल्हा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. पालेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, डॉ. संदीप साळूखे, प्रशासन अधिकारी डॉ. लांब, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे, जिल्हा प्रसिध्दी अधिकारी अमर पाटील, जिल्हा पर्यवेक्षक महेश सातोशे, प्रशांत पाटील, अलताफहुसेन शेख, रामचंद्र घाग, आदील पठाण, सचिन मगर, जुबेर मोमीण, मानसिंग वाशीकर, एकनाथ जोशी, सतिश जाधव, अमोल लेंडवे, विक्रम सावंत, प्रविण मुळीक, मंजूश्री चव्हाण, माधवी जगताप, महादेव घोडके यांनी आपली मत व्यक्त केलीत प्रस्ताविक डॉक्टर फारूक देसाई यांनी केले. एम.बी. चौगले यांनी सुत्रसंचलन तर आभार जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.