HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

खुषखबर ..! कोल्हापुरात लवकरच पोलीस भरती

खुषखबर ..! कोल्हापुरात लवकरच पोलीस भरती

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. या भरतीमध्ये एकूण १५४ रिक्त पदांसाठी १२,००० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया १९ जून ते २७ जून या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. दररोज १४०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. 

उमेदवारांची मैदानी चाचणी विशेषतः धावणे आणि गोळाफेक या प्रकारात असेल. पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर आणि १०० मीटर धावणे, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर आणि १०० मीटर धावणे आणि गोळाफेकच्या चाचण्या असतील 

यावेळी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणीची वेळ ऑनलाईन नोंदवली जाईल आणि फेस आयडीद्वारे बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, उमेदवारांनी पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी १८ ते ३३ वर्षे ठेवण्यात आली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.