वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या 7 तासात करता येणार कोल्हापूर - मुंबई प्रवास... पहा वेळापत्रक

वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या 7 तासात करता येणार कोल्हापूर - मुंबई  प्रवास... पहा वेळापत्रक

कोल्हापूर प्रतिनिधी :-

कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन ने प्रवास करणं शक्य होणार आहे. वंदे भारत रेल्वेने अवघ्या सात तासात मुंबई ते कोल्हापूर प्रवास करता येणार आहे. मुंबई पासून ठाणे -कल्याण-पुणे-सातारा-सांगली-मिरज-कोल्हापूर या स्टेशन्स वरून ही रेल्वे धावणार असून राज्यातील ५ वी वंदे भारत जानेवारी अखेर पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. 

  वंदे भारतच्या संभाव्य वेळापत्रकानुसार कोल्हापुरातून पहाटे 5.50 मिनिटांनी सुटेल. मिरजेत 6 वाजून 18 मिनिटांनी पोहोचेल. सांगली (6.35), सातारा (7.55), पुणे (10.03) कल्याण (12.05), ठाणे (12.25), सीएसटी (12.56) मिनिटांनी पोहोचेल. मुंबईतील सीएसटीवरून सायंकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी सुटेल. ठाणे (5.25), कल्याण (5.39), पुणे (7.55), सातारा (9.25), सांगली (11.33), मिरज (11.45) कोल्हापुरात 11 वाजून 55 मिनिटांनी येईल.

 वंदे भारत’ रेल्वेमुळे देशातील रेल्वेचा खऱ्या अर्थाने चेहरा बदलला. पारंपरिक रेल्वेच्या तुलनेत पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ डिझाइन व बांधणी केलेल्या ‘वंदे भारत’ने भारतीय प्रवाशांना सेमी हायस्पीड रेल्वेचा अनुभव दिला. हा अनुभव आता कोल्हापूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना देखील लवकरच अनुभवता येणार आहे.