विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 4 व 5 नोव्हेंबर 2024 रोजी वारणा कोडोली येथे करण्यात आले. या स्पर्धेत सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांचा सहभाग होता, तसेच एकूण आठ संघांनी स्पर्धेत भाग घेतला.

स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत सातारा व सांगली संघांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संजय घोडावत स्कुलच्या संघाने सांगली संघासमोर ५२ धावांचे आव्हान ठेवले. घोडावत स्कुलच्या विजय कलालने २५ धावा, विन्यास भटने १६ धावा, तर विहान लड्डाने १० धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. लक्ष्याचा पाठलाग करताना सांगली संघ ४० धावांवर गारद झाला, त्यामुळे संजय घोडावत स्कूलने हा सामना १२ धावांनी जिंकला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.

संजय घोडावत स्कूलच्या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार विहान लड्डा व उपकर्णधार विन्यास भट यांनी केले. संघात विजय कलाल, पंकज गोदेजा, साईराज पानसरे, क्षितिज जाधव, ऋणीत इदाते, श्लोक पाटील, मन ओसवाल, मनन ओसवाल, महेंद्र आरोरी, स्वराज सातपुते, अंश पटेल, तेजस शालगर, शौर्य पाटील, आणि आरुष रावत या खेळाडूंचा समावेश होता. संघाचे मार्गदर्शक प्रशिक्षक संदीप बिरनगे, आकाश कांबळे, अमोल वाडकर, आणि भावना पाटील हे होते. क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर यांची प्रेरणा मिळाली. 

संजय घोडावत स्कूलच्या क्रिकेट संघाच्या या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य अस्कर अली यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या .