वसंतदादा रक्तपेढीमध्ये वाढदिवस साजरा करा - ॲड बाळासाहेब जाधव
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
मिरज: वसंतदादा रक्तपेढीमध्ये प्रत्येक व्यक्तीने रोटेरियंसने वाढदिवस साजरा करावा त्यामुळे खूप आनंद व प्रचंड समाधान मिळते असे मत रोटरी क्लब ऑफ मिरज पुढील वर्षाचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या ४४व्या वाढदिवसानिमित्त १०वे रक्तदान केले. रोटरी क्लब तर्फे रक्तदानाला पुढील वर्षी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक रक्तदात्याचा वसंतदादा रक्तपेढी तर्फे केक कापून वाढदिवस साजरा केला जातो व त्याचा वार्षिक स्मरणिकेमध्ये उल्लेख केला जातो अशी माहिती वसंतदादा रक्तपेढीचे सल्लागार डॉ. रवींद्र फडके यांनी दिली. रक्त केंद्राचे तंत्रज्ञ जबिन शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन बाळासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी युवराज मगदूम, अनिल कांबळे, अमोल पाटील व सौ मधुरा बाळासाहेब जाधव उपस्थित होते.