वाघनखे विवाद: उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना टोचले

वाघनखे विवाद: उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना टोचले

पुणे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून लंडनहून आणलेली वाघनखे नकली असल्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे. विरोधी पक्षांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चिमटा काढला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वाभिमानाने पेटलेला दिसला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये या व्यापारी हुकुमशाहांविरोधात राण किंवा वनवा पेटवलेला पाहिजे. हा वनवा पेटवण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण तुमच्या हातात तलवार आहे."

ठाकरे पुढे म्हणाले, "मुनगंटीवारांनी वाघनखे आणली आहेत, पण नखांच्या मागे वाघ असावा लागतो. त्या वाघनखांना शिवाजी महाराजांच्या नावाने महत्त्व आहे. मुनगंटीवारांच्या मागे वाघ नसल्यामुळे वाघनखे आणि मुनगंटीवार जुळत नाहीत," असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.