खंडकरी शेतकऱ्यांची अडचणी सोडविण्यासाठी कॅम्पचे आयोजन - आ. प्रकाश आबिटकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अत्याधित कोल्हापूर सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे ३० ते ३५ हजार एकर होऊन अधिक क्षेत्र असून हे क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांना खंड भरून घेण्यासह विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी दि. 1 जुलै ते 26 जुलै पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांच्या तहसील कार्यालयामध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर प्रसिद्धी पत्रकाद्वारे यांनी दिली.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणेसाठी सातत्याने विधानसभेमध्ये आग्रही भूमिका मांडली आहे. विधानसभेमध्ये देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतऱ्यांना त्या जमिनी मिळाव्यात यासाठी कायदा करण्याचे काम सुरू आहे. परंतू त्याचबरोबर दरवर्षी देवस्थान जमिनीच्या कबुलायीत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोल्हापूर कार्यालयात 150 ते 200 कि.मी. अंतरावरून चंदगड, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना यावे लागते. यामुळे शेतऱ्यांना आर्थिक नुकसानीसह वेळही वाया जात होता. यामुळे या शेतकरी बांधवांनी तालुका स्तरावरील तहसील कार्यालयामध्ये कॅम्पचे आयोजन करावे अशी मागणी माझेकडे केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करून त्याठिकाणी देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी जावे अशी मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करण्याचे नियोजन केले असून यामुळे देवस्थानच्या जमिनी कसणारे शेतकऱ्यांच्या कबुलायत, खंड भरून घेण्यासह विविध प्रश्न व अडचणी तालुकास्तर सुटणार आहेत. देवस्थान कासणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका स्तरावर जाऊन आपल्या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी असे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले आहे.
कॅम्पचे नियोजन :
तहसील कार्यालय, पन्हाळा दि.01 जुलै ते 5 जुलै
तहसील कार्यालय, गडहिंग्लज दि.01 जुलै ते 5 जुलै
तहसील कार्यालय, करवीर दि.01 जुलै ते 5 जुलै
तहसील कार्यालय, भुदरगड दि.01 जुलै ते 5 जुलै
तहसील कार्यालय, राधानगरी दि.01 जुलै ते 5 जुलै
तहसील कार्यालय, आजरा दि.08 जुलै ते 12 जुलै
तहसील कार्यालय, हातकणंगले दि.08 जुलै ते 12 जुलै
तहसील कार्यालय, कागल दि.08 जुलै ते 12 जुलै
तहसील कार्यालय, चंदगड दि.08 जुलै ते 12 जुलै
तहसील कार्यालय, शिरोळ दि.15 जुलै ते 19 जुलै
तहसील कार्यालय, गगनबावडा दि.22 जुलै ते 26 जुलै