विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यातून पाच ते सहा जागा लढवणार - आर.के.पोवार

विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यातून पाच ते सहा जागा लढवणार - आर.के.पोवार

कोल्हापूर (प्रतिनिधि) : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत पक्षातर्फे 'माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र' या मोहिमेत सहभागी होऊन ऑनलाइन लिंकद्वारे आपले मत नोंदवणे करिता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या माहितीसाठी व होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या पारंपारिक चंदगड, राधानगरी-भुदरगड व कागल या मतदारसंघासह कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी अशाप्रकारे जिल्ह्यातून पाच ते सहा मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता येणारी विधानसभा निवडणुक देखील पूर्ण ताकदीनिशीने लढवून मग तो उमेदवार कोणीही असो पण आमदार पक्षाचाच झाला पाहिजे असा निश्चय करण्यात आला. 

यावेळी सरचिटणीस सुनिल देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई माने, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, रामराजे कुपेकर, निरंजन कदम, रावसाहेब भिलवडे, शिवानंद माळी यांची भाषणे झाली. तर आभार कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी मांडले.

यावेळी गणेश जाधव, आप्पा हजारे, मकरंद जोंधळे, मुसाभाई कुलकर्णी, नितीन मस्के, नागेश परांडे, नागेश शिंदे, महादेव पाटील, फिरोज खान, गणेश नलवडे, सायली महाडिक, शितल तिवढे, अरुणा पाटील, सुनीता पवार, सदानंद कवडे, दिनकर धोंगडे शशिकांत कदम, रामराजे बदाले, भीमराव आडके, सुरेंद्र माने, दत्ताजी खोपडे, मंगल कट्टी, राजाराम सुतार, राजेंद्र पाटील, भीमराव आडके, आदित्य निळकंठ, सुशील खामकर, राजू पिष्टे, अधिक जाधव, रियाज कागदी, सोहेल बागवान, रमेश पवार, छाया नलवडे, राहुल गवाणे इ. सह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.