जिल्हा परिषदेकडून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र, शेळी वाटप

जिल्हा परिषदेकडून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र, शेळी वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्हा परिषद स्वनिधीमधून ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र आणि ७५ टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या, दारिद्र्यरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप केली जाणार आहे. पात्र लाभार्थीनी अर्ज देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य - कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून २०२४-२५ मधील ही योजना जाहीर केली आहे.

कार्तिकेयन एस. म्हणाले, 'जिल्ह्यात ३.५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप केले जाणार आहे. लाभार्थीकडे लहान-मोठी किमान ५ जनावरे असणे गरजेचे आहे. लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी जमीन असावी, वीज जोडणी असावी, इतर योजनेतून कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घेतलेला नसावा. तसेच ४.७५ टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या, दारिद्र्यरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप केले जाणार आहे. योजनेतील लाभार्थीचे वय १८ ते ६० दरम्यान असावे, लाभार्थीकडे शेळीपालनासाठी पुरेशी जागा असणे गरजेचे आहे.'

१५ ऑगस्टअखेर पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी दिली.