शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात पुढार्‍यांना प्रवेश बंदी

शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात पुढार्‍यांना प्रवेश बंदी

नेर्लेकरांनी घेतला मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - नारायण लोहार 

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने गावात प्रवेश करू नये तशी भूमिका ग्रामस्थ व तरुणांनी घेतली आहे.

    नेर्ले गावातील सार्वजनिक सभागृहामध्ये मोठ्या संख्येने सकल मराठा समाजातील वयोवृद्ध तरुण सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.ज्येष्ठ नागरिक सखाराम भणगे यांनी प्रस्तावना केली तसेच मानसिंग घोडे पाटील,सचिन पाटील,आर.सी.पाटील,महादेव दिंडे, आनंदा जामदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली व मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दिला.सोमवारी तहसीलदार कार्यालय,शाहूवाडी पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात येणार आहे.गुरुवार संध्याकाळी ,७: ००वा .भव्य रॅली,शुक्रवारी ८: ००वा. कॅन्डल मार्च मोर्चा,रविवारी उपोषण असा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.नेर्ले गावातील ग्रामपंचायत च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झटत असलेले मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनादरम्यान कोणत्याही पक्षाच्या राजकीय व्यक्तीने गावामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

   या सभेसाठी सरपंच ग्रामपंचायत नेर्ले सदस्य व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण कार्यकर्ते मानसिंग घोडे पाटील यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांना एकत्रित करून दिशा देण्याचा प्रयत्न केला. सर्व तरुणांनी मोठ्या प्रमाणात घोषणाही केल्या तसेच जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत गावातील हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला.आभार एस. एन. पाटील यांनी मानले.