घोळसवडे जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरताना एकास अटक

घोळसवडे जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरताना एकास अटक

घोळसवडे जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरताना एकास अटक

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते


मलकापूर वनक्षेत्रातील वनक्षेत्र घोळसवडे गावच्या वनक्षेत्रामध्ये 28/12/2022 रोजी जंगलातील ट्रॅप कॅमेरा मध्ये बाळू उर्फ पांडुरंग लाड रा. मुतकलवाडी ता. शाहूवाडी हा जंगलात फिरताना कॅमेरा मध्ये आढळला. यावेळी जंगलात शिकारीच्या उद्देशाने शस्त्रासह फिरत असल्याचे आढळले. वन्य जीव संरक्षण अधिनियमन १९७२ कलमनुसार. भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (१)(२) अनन्वये आरोपीस अटक करून शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची वन कोठडी सुनावली. राखीव वनक्षेत्रात विनापरवाना शस्त्रासह घुसणे आरोपीला चांगलेच महागात पडले. ही कार्यवाही उपसंरक्षक कोल्हापूर - जी. गुरुप्रसाद, वनक्षेत्रपाल मलकापूर- अमित भोसले, वनपाल- संजय कांबळे, रशीद गारदि, स्वाती मेथी, साधू कांबळे, दिग्विजय पाटील यांनी केली.