शिक्षकांच्या बीएलओ ऑर्डर रद्द करा : जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर

शिक्षकांच्या बीएलओ ऑर्डर रद्द करा : जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर
पुन्हा बीएलओच्या ऑर्डर्स देणे म्हणजे गुणवत्तेवर विपरीत परिणाम करण्यासारखे

कोेल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ संतोष पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान शिक्षकांच्या बीएलओच्या ऑर्डरी रद्द करण्याची विनंती समितीच्यावतीने करण्यात आली. 

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत असे असताना पुन्हा त्यांना बीएलओची ऑर्डरी दिल्या जात आहेत. अशा प्रकारचे आदेश देणे म्हणजे शालेय गुणवत्तेवर विपरीत परिणाम करण्यासारखे आहे. त्यामुळे सदर शिक्षकांच्या बी एल ओ च्या ऑर्डरी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत पत्रव्यवहार केला जाईल अशी ग्वाही यावेळी  सीईओ संतोष पाटील यांनी दिली. 

सहाव्या टप्प्यातील शिक्षकांना समान योजनांसाठी सर्व जागा दाखवण्याची विनंती केली. याबाबतीत सुद्धा सीईओनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच ज्या शिक्षकांचे बीएससी पूर्ण झाले आहे. त्यांचे विज्ञान विषय शिक्षक म्हणून प्रमोशन देण्यात यावे. तसेच जे विषय शिक्षक बीएससी पूर्ण झालेले असून सध्या समाजशास्त्र विषय शिक्षक म्हणून काम करतात त्यांना विज्ञान विषय शिक्षक म्हणून आदेश मिळावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर पाटील यांनी खाते प्रमुखांना या संदर्भातील माहिती द्या त्यानंतर पुढील कार्यवाही करू असे सांगितले. परवा झालेल्या मुख्याध्यापक प्रमोशनचे आदेश पुढील आठवड्यात देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, महिला राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे, महिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोईटे, शरद केनवडे, कार्याध्यक्ष गणपती मांडवकर, कोषाध्यक्ष सुनील कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव पाटील, युवराज काटकर, प्रमोद भांदिग्ररे, अशोक कांबळे,विनायक चौगुले, बाबासो धुमाळ आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.