भाजपा मंगळवार पेठ मंडळाच्यावतीने वीर बाल दिवस साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर व मंगळवार पेठ मंडलाच्या वतीने आज वीर बाल दिन नेहरूनगर विद्या मंदिरात संपन्न झाला. लेझीमच्या तालावर मुलांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळच्या सत्रात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिखांचे 10 वे गुरू गुरुगोविंद सिंगजी यांच्या वीर साहिबजादे अजितसिंग, जोरावरसिंग, फतेहसिंग आणि जुझारसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून
शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबाराचे व विवीध स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आज शाळेत आरोग्य तपासणी शिबिर, रंगभरण, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा यांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी या सर्व स्पर्धा चे बक्षीस वितरण समारंभ प्रदेश सचिव महेश जाधव, मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष सुधीर देसाई, ट्रस्पोर्ट जिल्हा अध्यक्ष सयाजी आळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक नलिनी साळोखे ,शिक्षण संजय पाटील शिवाजी गुरव विठ्ठल दुर्गुळे व शिक्षकांनी नेटकेपणाने नियोजित केलेने कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला.