शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांना समरजितसिंह घाटगेंकडून अभिवादन

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी मावळ्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक रमेश माळी,सतीश पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक रणजीत पाटील, सुशांत कालेकर, प्रविण कुराडे, आप्पासो भोसले, नंदकुमार माळकर राजू जाधव, आप्पासो हुच्चे, सातापा घाटगे, प्रमोद कदम, बंडा वाळवेकर,प्रमोद सोनुले,बंडा बारड,आनंदा भोपळे,सचिन मोकाशी,सज्जन पवार आदी उपस्थित होते.