श्री क्षेत्र सरवडे येथे तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशत्कोत्तर ३७५ सोहळा उत्साहात संपन्न

श्री क्षेत्र सरवडे येथे तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशत्कोत्तर ३७५ सोहळा उत्साहात संपन्न

सरवडे प्रतिनिधी : श्री क्षेत्र सरवडे येथे तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशत्कोत्तर ३७५ व्या सोहळ्याचा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो भाविकांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाप्रसादाचा लाभ घेताना गोकुळ संचालक श्री. अभिजीत तायशेटे साहेब, विष्णू भिवा जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजयसिंह सावंत, युवा नेते शुभम चव्हाण आकनुर व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

तुकाराम महाराजांच्या पवित्र कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भाविक भक्तांनी सोहळ्यादरम्यान भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरवडे येथील स्थानिक ग्रामस्थ, भक्तगण आणि देवस्थान समितीने विशेष परिश्रम घेतले.