HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

इन्स्टाग्राम रील्समुळे खरी कला दुर्लक्षित? 'या' अभिनेत्रीने केला माध्यमांचा खुलासा

इन्स्टाग्राम रील्समुळे खरी कला दुर्लक्षित? 'या' अभिनेत्रीने केला माध्यमांचा खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) - सध्या चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेले इन्फ्लुएन्सर्स झळकताना दिसतात. विशेषतः इन्स्टाग्राम रील्समुळे लाखो फॉलोअर्स मिळवणारे अनेक स्टार्स थेट छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर झळकतात. मात्र, या झपाट्याने बदललेल्या कलाविश्वात खरी कला दुर्लक्षित झाली असून खऱ्या कलाकारांना कामाच्या संधी कमी मिळतात, असा मुद्दा ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी ठामपणे मांडला आहे.

एका मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या की, "इन्स्टाग्राम रील्समुळे कलाकार नाही, तर स्टार्स तयार झाले आहेत. कलाकार असणं वेगळं असतं, पण सध्या सगळ्या माध्यमांमध्ये – नाटक, चित्रपट, मालिका – आपण स्टार शोधतोय, कलाकार नाही. जर आपण कलाकार शोधले असते, तर हे इन्स्टा स्टार्स कामापासून दूर राहिले असते."

त्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त करत सांगितलं की, "आम्ही कलेचं शिक्षण घेतो, वर्षानुवर्षे मेहनत घेतो, पण तरीही संधी मिळत नाही. आणि कुणी अचानक रील्सवरून प्रसिद्ध होतो आणि त्याला किंवा तिला मुख्य भूमिका दिली जाते. ती व्यक्ति खरंच पात्र आहे का, हे कोणीच विचारात नाही." आणि "लोकांनाही असंच हवं असतं का? चॅनल्स आणि निर्मात्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे का? जर असं असेल, तर मग चांगले चित्रपट का चालत नाहीत, याचं उत्तर तिथंच मिळतं असंही गार्गी फुले म्हणाल्या. 

शेवटी त्यांनी स्पष्ट मत मांडलं की, "जर निर्मात्यांनी उत्तम कलाकार घेऊन दर्जेदार कथा सादर केल्या, तरच सिनेमा आणि मालिका यशस्वी होऊ शकतात. पण केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रील्स स्टार्सवर भर दिला, तर कलाक्षेत्राचं नुकसान होणार असल्याचही त्या म्हणाल्या. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.