HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात सुजित अर्जुन मुंढे लिखित ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, विधी अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. वाय. धूपदाळे, रासेयो संचालक डॉ. तानाजी चौगले,  सुदर्शन देसाई आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, “समाजात कायद्याचे महत्त्व, त्याचे आकलन आणि अंमलबजावणी या प्रक्रियेत जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी संशोधनाधारित व अभ्यासपूर्ण साहित्याची आवश्यकता आहे. कायदे काळानुसार बदलतात, म्हणून फक्त फौजदारी नव्हे, तर शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कायद्यांचा सुद्धा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. विशेषतः विद्यापीठ कायद्याबाबतही संशोधन व्हावे,” असे मत व्यक्त केले. 

लेखक सुजित मुंढे यांनी  सांगितले की, “पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील संबंध अधिक प्रभावी होण्यासाठी कायद्याची अचूक व सुलभ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या पुस्तकात १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू होणाऱ्या भारतीय न्याय संहिता २०२३ आणि जुन्या भारतीय दंड संहिता १८६० यामधील महत्त्वाच्या बदलांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. याशिवाय, CCTNS (Crime and Criminal Tracking Network System) प्रणाली आणि विविध राज्य/केंद्रशासित पोलीस पोर्टल्सवरील नागरिक सेवा सुविधा यांचा आढावा ग्रंथात घेतला आहे. ”

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध सन्माननीय अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, उत्साही व ज्ञानवर्धक वातावरणात पार पडला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.