शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद
वारणानगर (प्रतिनिधी) : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाने आष्टा, जि. सांगली येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत विजेतेपद पटकाविले, अंतिम सामन्यात वालचंद कॉलेज ऑफ इंजि. महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. तसेच पूर्वा भोसले हिला बेस्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. संघामध्ये पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, अनन्या संदे, वृषाली निकम, वैष्णवी अडनाईक, श्रेया जाधव, प्रेरणा पाटील, कृष्णाली पाटील, आर्या पाटील, सम्राज्ञी पाटील या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूना श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष मा. आमदार विनयरावजी कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री उदय पाटील व श्री. सागर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.