संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा खादी ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त विद्यमाने “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमास मार्गदर्शक उमाकांत डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध खादी आणि ग्रामोद्योग संस्थेच्या योजनांची माहिती लघुउद्योग निर्मिती त्यासाठी आवश्यक शासनाचे साह्य पीटीए कौशल्य विकास प्रशिक्षण आणि विविध कोर्स विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी इन्स्टिट्यूट मध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा ग्रामोद्योग आयोगा अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे सुरु असलेले विविध प्रशिक्षण, प्रशिक्षणाची निवड करण्याची पद्धती, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रावर मिळणारे उपयुक्त शासनाचे फायदे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे शासनाचे कोर्सेस याविषयी माहिती देवून “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे उदेश आणि उपुक्त्ता या विषयी मार्गदर्शन केले.
या वेळी इंजीनियरिंग डिग्री सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डी. आर. पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी कोंगे, आयटीआय विभागाचे गटनिदेशक, प्रा. अविनाश पाटील, इन्स्टिट्यूट मधील आणि बाहेरील नोकरी व्यवसाय करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुजित मोहिते यांनी मानाले.
हा कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट. व्ही. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.