HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जळगावच्या राजा ढाले धम्मसंगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. आलोक जत्राटकर

जळगावच्या राजा ढाले धम्मसंगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. आलोक जत्राटकर

कोल्हापूर : जळगाव येथील सम्यक प्रबोधन मंचातर्फे येत्या ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रज्ञावंत राजा ढाले साहित्य धम्मसंगीती’चे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची निवड करण्यात आली आहे. मंचाचे अध्यक्ष प्रा. यशवंतराव मोरे यांनी ही घोषणा केली आहे.

येत्या रविवारी (दि. ३०) जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवनामध्ये धम्मसंगीती होणार असून अॅड. गाथा ढाले (मुंबई) यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होईल. ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजेश झाल्टे हे स्वागताध्यक्ष आहेत. या समारंभास भदन्त पी. संघरत्न थेरो, ज्येष्ठ कामगार नेते करूणासागर पारे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप पगारे, कास्ट्राईबचे राज्य सचिव प्रा. एकनाथ मोरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मोहनभाऊ आढांगळे उपस्थित राहणार आहेत. धम्मसंगीतीमध्ये धम्मातील पारंपरिकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत धम्म, प्रज्ञावंत राजा ढाले यांचा दलित पँथर ते प्रबुद्ध मानव असा जीवनप्रवास आणि प्रशिक विद्यार्थी संघ ते राजकीय चळवळ या विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यभरातून विचारवंत व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते साराभाई वेळुंजकर (मुंबई), प्राचार्य बापूसाहेब माने (कोल्हापूर), एन.डी. गवळे (नांदेड) आणि बबन बनसोड (नागपूर) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याखेरीज निष्ठावंत कार्यकर्ता, वैचारिक अधिकारी पुरस्कारांसह साहित्य, चित्रकला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या युवकांचाही गौरव करण्यात येईल.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.