समरजितसिंह घटागेंची पालकमंत्र्यांवर बोचरी टीका

समरजितसिंह घटागेंची पालकमंत्र्यांवर बोचरी टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरदचंद्र पवार यांनी त्यांना मुलासारखे प्रेम दिले तर सुप्रियाताई मोठ्या भावाप्रमाणे राखी बांधायच्या.ईडीपासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालक मंत्री पदाच्या तुकड्यासाठी त्यांनी या कौटुंबिक नात्याचा सौदा केला.त्यामुळे त्यांना आता झोप येत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत.अशी बोचरी टिका शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली.

कागल येथे लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

घाटगे पुढे म्हणाले,काही दिवसापूर्वी जी काही चुकीचे वक्तव्य केले गेले.जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे.आदरणीय शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्रामध्ये एखाद्या प्रवेशासाठी पहिल्यांदाच कागलमध्ये आले. जयंत पाटील साहेब आले.परवा सुप्रियाताई सुळे पुण्याच्या मेळाव्यात आल्या.मुंबईच्या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार सचिन अहिर,आ.सुनिल शिंदे येत आहेत.हे सर्वच चुकीचे वक्तव्य करणा-यांच्या कुटूंबातील होते.त्यांना आता कळून चुकले आहे की मी मोठी चूक केली आहे.कौटुंबिक संबंधांचा, वडीलधारी नेत्यांवरील निष्ठेचा त्यांनी सौदा केला .कधीही न मिळालेल्या पालक मंत्री पदासाठी त्यांना ज्या पवारसाहेब यांनी आजवर विश्वास दिला तो विश्वास विकून त्यांनी उतरत्या वयामध्ये त्यांची साथ सोडली.यामुळे त्यांना आता आयुष्यभर झोप लागणार नाही. मला त्यांनी ते वक्तव्य केल्याबद्दल कोणताही राग वाटत नाही. उलट त्यांची कीव येते. त्यांची परिस्थिती बघून दया येते की अशा व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते. पण प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती सीमा आता त्यांनी ओलांडलेली आहे अशा सीमा ओलांडलेल्या व्यक्तीला कागलची स्वाभिमानी जनता जागा दाखवून देणार आहे. 

शरद पवार साहेबांच्या कागल मधील सभेनंतर सर्वसामान्य अल्पसंख्यांक व्यक्तीच्या मागे पवार साहेब का लागले आहेत.असे वक्तव्य केले.आपल्या वडिलांसारख्या असलेल्या नेत्याबाबत असा जातीयवादी आरोप करणे योग्य आहे का? ज्या स्वर्गीय राजेसाहेब यांनी तुम्हाला राजकारणात आणले त्यांच्याविषयी श्रीराम मंदिर उभारणीबाबत चुकीची वक्तव्ये करू नका. स्वर्गीय मंडलिक साहेबांच्यामुळे जिल्हा बँकेत तुमची एन्ट्री झाली त्यांच्या महालक्ष्मीच्या दूध संघाच्या कर्जाच्या वसुलीसाठीचा बोर्ड त्यांच्या घरासमोर लावला. काय वेदना झाल्या असतील त्यावेळी मंडलिक साहेबांना. माझा मुलगा म्हणून तुम्हाला मतदान करा. अशी ओळख स्वर्गीय कुपेकर साहेब यांनी करून दिली.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संध्याकाकींनी पक्ष बदलल्यानंतर त्या पडतील भाषा करणारे हे कोण? असे घाटगे म्हणाले.