सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आर. एल. तावडे फाउंडेशनचे, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन जय पॅलेस कळंबा, येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींनी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष किशोर तावडे यांच्या प्र्तीमेला हार घालून अभिवादन केले व दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. मंगेश पाटील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मौर्या ग्रूप कोल्हापूर व सन्माननीय अतिथी म्हणून मा. चंद्रशेखर सिंघ सिनियर सहसंचालक हस्तकला वस्त्रोद्योग विभाग, भारत सरकार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना मा. मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे विचार व व्यवसायाच्या अनेक संधी बद्दल मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी चंद्रशेखर सिंघ यांनी विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्त्व, शिस्त व यशाचे मार्ग याचे महत्व सांगितले. महाविद्यालयाच्या सचिव मा. शोभा तावडे यांनी विद्यार्थ्यांना " योग्य वेळी आपल्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळते असे संबोधन केले." यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार बगली यांनी सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले आणि महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचा आढावा घेतला आणि नमूद केले कि, "महाविद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चालू आहेत." महाविद्यालयाचे संचालक डॉ. ए . आर. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. सदर स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटक, आणि काव्यवाचन या विविध क्षेत्रात आपल्या कला कौशल्यांची प्रचिती दिली. सदर कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून अनुजा मजली- गायन, केतकी पाटील- नृत्य, आणि प्राध्यापिका ज्योती हिरेमठ- फॅशन शो साठी परीक्षक म्हणून लाभले. विशेष अतिथि डॉ. आर आर हिरेमठ, प्राचार्य के. डी. सी. ए. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मेसी, कोल्हापूर यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे असे नमूद केले व विविध पारितोषिकांचे वितरण केले. सदरचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्याकरीता सांस्कृतिक विभाग प्रमुख उद्धव अतकिरे, प्रा. साक्षी माने, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन प्रा. अमोल दीक्षित आणि प्रा. निशिता वाणी यानी केले. प्रा. साक्षी माने यानी सर्वांचे आभार मानले.