सार्वजनिक स्वचछतागृहे नियमित स्वच्छ करण्याची लोकराज्य जनता पार्टीची मागणी.*

सार्वजनिक स्वचछतागृहे नियमित स्वच्छ करण्याची लोकराज्य जनता पार्टीची मागणी.*

पत्रकार- सुभाष भोसले

  कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील अस्वच्छ मुताऱ्या व उद्यानातील कचरा वेळेत उचलावा,उद्यानात अंधारात चालणारा ओपन बार वर कारवाई करणेत यावी या मागणीचे निवेदन कोल्हापूर महानगर पालिका आरोग्य विभागास लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने देणेत आले.यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण,जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे, जिल्हा संघटक संतोष बिसुरे,शहराध्यक्ष विजय केसरकर,सरचिटणीस शशिकांत जाधव,शहर उपाध्यक्ष संग्राम पाटील,संघटक बाळकृष्ण गवळी आदी लोकराज्यचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चर्चेत, शहरातील मुताऱ्या नियमित स्वच्छ केल्या जातील,उद्यानातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाईल असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून देणेत आले.