सावंतवाडी एस. टी.परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा नक्की वाली कोण ? नियंत्रक की महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यकारिणी,?

सावंतवाडी एस. टी.परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा नक्की वाली कोण ? नियंत्रक की महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यकारिणी,?

सावंतवाडी प्रतिनिधी :- अमित वेंगुर्लेकर 

पणजी पत्रादेवी सात वाजता पणजीहून सुटणारी सामान्य एस्टी बस परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे 2×2 एसी दरात .सावंतवाडी पासून गोवा राज्यात नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज अचानक 2×2 जादा दरातील एस्टी बस प्रवास करताना अधिक तिकीट आकारल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

  याबाबत सावंतवाडी एस्टी परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्नीद्वारे विचारणा केली असता त्यांनी उद्धट  उत्तरे दिली असल्याचे मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन भारत प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना सांगितले आहे. नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच्या प्रवासात संबंधित एस्टी परिवहन महामंडळाच्या गलिच्छ कारभारामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. याबात विचारणा केल्यावर सबंधित अधिकारी मनमानी पद्धतीने उत्तरे देतात. नियमित निमआराम बस सेवा असताना फक्त नी फक्त एस्टी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे पणजी ते सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे याबाबतची दाखल संबंधित एस्टी परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने त्वरित घ्यावी व सादर प्रकरणात सावंवाडी आगारातील दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असा इशारा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना दिला आहे.