'सोहम' चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या पंधराशे वर्षाची परंपरा उलगडणार

'सोहम' चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या पंधराशे वर्षाची परंपरा उलगडणार

'सोहम' चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या पंधराशे वर्षाची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली असून या यामध्ये अध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती - शिक्षण - वैधकीय सह विविध पैलूच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी हा चित्रपट मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून समाजातील सर्वांनी आग्रहाने पावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते उज्वल नागेशकर यांनी केले. लवकरच अक्रॉस इंटरटेनमेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यासंदर्भातील बैठक चैताली सभागृहात संपन्न झाली. 

  चित्रपटाची पार्श्वभूमी सांगताना निर्माते संजय बहिरे यांनी परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज हे अनुकरणीय उदाहरण आहेत त्यांचे विविध पैलूंचे समाज उपयोगी काम संस्थेने सर्व समोर यावे यासाठी ही निर्मिती ही सोहम् चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. धनश्याम पटेल यांनी येत्या मे महिन्यात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे वितरण केले जाणार असल्याचे सांगितले.                                                      

सिद्धगिरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांनी या चित्रपटाने निमित्ताने सलगतेने आणि प्रभावीपणे मठाचे आणि स्वामींचे काम हे समाजातील सर्वस्तरापर्यंत पोहचणार असून ही संधी नेमकीपणे सर्वांनी साध्य केली पाहिजे असे मत व्यक्त केले .यांच्यासह बांधकाम विकसक शंकर पाटील मराठा महासंघाचे शशिकांत पाटील , आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे यांनी ही आपली मते व्यक्त केली . शेवटी रोटरी क्लब करवीर चे उदय पाटील यांनी आभार मानले . यावेळी संभाजी पाटील , राजेश डाके , नारायण देसाई , परशुराम जाधव , मंगेश जागेदार ,विक्रम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थित होते . .