हवामान खात्याचा हाय अलर्ट:या दिवसापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस
मुंबई : जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली, मात्र, गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे. जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.तर कोल्हापूर झिल्यातील ऐकून ३५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.