हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने शिक्षकांना देणार आदर्श शिक्षक पुरस्कार

हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने शिक्षकांना देणार आदर्श शिक्षक पुरस्कार
हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने शिक्षकांना देणार आदर्श शिक्षक पुरस्कार

सुभाष भोसले / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कागल मतदारसंघातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले आहे.


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन  मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून पुरस्कार देऊन शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. विविध नमुन्यातील अर्ज फाउंडेशनच्या कागल, मुरगूड, उत्तूर, गडहिंग्लज या शाखेत 19 ऑगस्टपर्यंत सादर करावेत असे आव्हान नवीद मुश्रीफ यांनी केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष व कोजिमाशिचे संचालक राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष सुनील माळी, नंदकुमार घोरपडे, सुकुमार पाटील, अरविंद पाटील, के. व्ही. पाटील, नंदकुमार कांबळे, काका पाटील, तानाजी सामंत, संजय कदम , तानाजी पाटील, विनायक तोरसे इत्यादी उपस्थित होते.