महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी एकजुटीने लढू - बाबासाहेब देवकर

महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी एकजुटीने लढू - बाबासाहेब देवकर

सडोली खालसा (प्रतिनिधी) : बहुजन समाजाच्या विकासाची उतरंड मोडीत काढण्याचा डाव टाकणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी एकजुटीने लढून, स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्या कार्यातून उमटविला होता त्यांच्या कार्याची ही ज्योत अखंड ठेवण्यासाठी राहूल पी.पाटील यांना आमदार करुन साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करुया.असे आवाहन शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी केले.

   करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.पाटील यांच्या कुरुकली (ता.करवीर) येथील प्रचारसभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील होते.

   भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष एम.आर.पाटील कुरुकलीकर म्हणाले,कुरुकली गावच्या विकासात स्व.आमदार पी.एन.पाटील यांचे मोठे योगदान आहे. ते उदार मनाचे निगर्वी नेतृत्व होते त्यांच्या पश्चात सर्वजण ताकदीने राहुल पाटील यांच्या मागे उभे राहून त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घालतील.

   सरपंच रोहित पाटील म्हणाले, साडेतीन वर्षात कुरुकली गावात स्व.आमदार पी.एन.पाटील यांच्या सहकार्यातून साडेआठ कोटींची विकासकामे झाली यासाठी उमेदवार राहुल पाटील यांनीही भरीव सहकार्य केले.तर दुसरीकडे ग्रामपंचायत शिफारस आणि प्रशासकीय मान्यता नसताना देखील नुसतेच नारळ फोडण्याचे आणि खोटे फलक उभारण्याचे काम नरके करत असल्याची टीका केली. 

 स्व.पी.एन.साहेबांनी जिल्ह्याचे नेतृत्व करताना कधीही कुणाला नोकऱ्या, पदे देतो म्हणून फसविले नाही. भूलथापा मारून बेरजेचे राजकारण कधी केले नाही. स्व.साहेब नेहमीच जनता हीच माझी ताकद आहे म्हणत, आज देखील हीच जनता माझी ताकद आहे. सर्वांनी आतापर्यंत साहेबांना साथ दिली तशीच साथ मलाही द्यावी,असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार राहुल पी. पाटील यांनी केले.

   यावेळी माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, भोगावती संचालक पांडुरंग पाटील, साताप्पा धामोडे,विक्रांत पाटील, बुद्धीराज पाटील, दत्तात्रय पाटील, एम.आर.कांबळे, समाधान पाटील (शिरोली दुमाला), आरपीआय चे पांडुरंग कांबळे, यांची भाषणे झाली.

  यावेळी भोगावती चे चेअरमन शिवाजीराव पाटील, केरबा पाटील, बाळासाहेब खाडे, क्रांतीसिंह पवार-पाटील,बी.ए.पाटील, बबनराव रानगे,सुभाष कोईगडे, सुनील पाटील, भोगावती माजी संचालिका तेजस्विनी पाटील, जयवंत बळवंत पाटील, वसंतराव पाटील, इंदुबाई सावे, उपसरपंच दिपाली पाटील, डॉ. दिग्विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कु. प्राजक्ता पाटील हिने आभार मानले.