23 एप्रिल रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्तपुरवठ्याची गरज भासते. आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही. म्हणूनच रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो. आपल्या देशाच्या लोकसंख्या पैकी 60 टक्के रक्तदान करण्यासाठी सक्षम असतात पण वर्षाकाठी यातले एक टक्का इतकेच रक्तदानासाठी पुढे येतात त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो.
याची जाणीव ठेवून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्री अनिरुद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक, या संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. डॉ अनिरुद्ध जोशी एमडी मेडिसिन,(सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या या संस्थांनी 1999 सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत 1.65 लाख युनिट इतके रक्तदान संकलित केले आहे.
या संस्थेमार्फत यावर्षीही मुंबई सह महाराष्ट्र मध्ये आणि गोवा गुजरात कर्नाटक व मध्य प्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महा रक्तदान शिबिर पार पडेल. रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची व्याप्ती फार मोठी असेल मुंबईतूनच सुमारे 8000 इतके रक्त संकलन केले जाईल असा विश्वास व्यक्त केला जातो. या रक्तदान शिबिराचा लाभ जवळपास 100 रक्तपेढ्या--सरकारी व खाजगी घेणार आहेत.
याआधी मुंबई 2019 साली या संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी मुंबईत सुमारे 8973 इतके तर महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मिळून 15937 इतके रक्त संकलन करण्यात यश मिळवले होते हा अनुभव लक्षात घेता 23 एप्रिल रोजीच्या महारक्तदान शिबिरालाही प्रचंड प्रतिसाद मिळेल त्याची पूर्वतयारी या संस्थेच्या स्वयंसेवकांनी केली आहे.
हे महा रक्तदान शिबिर अधिक यशस्वी करण्यासाठी व यातील सहभाग अधिक व्यापक करण्यासाठी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत या मतदान शिबिराला आपल्या प्रयत्नांची ही योगदान मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात येत असल्याचे अनिरुद्धाज मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीलसिंह मंत्री यांनी सांगितले.