'या' अभिनेत्रीला स्वत:चे वडिलच म्हणायचे वेश्या...घरच्या जबाबदा-या सांभाळत...पॉडकास्टमध्ये केला खुलासा

'या' अभिनेत्रीला स्वत:चे वडिलच म्हणायचे वेश्या...घरच्या जबाबदा-या सांभाळत...पॉडकास्टमध्ये केला खुलासा

मुंबई : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री शायनी दोशी आज एका प्रसिद्ध चेहऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र तिच्या यशामागे एक वेदनादायक आणि संघर्षमय कहाणी आहे, जी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहे.

शायनीने २०१३ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सरस्वतीचंद्र' मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण यशस्वी वाटचालीपूर्वी तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. तिने सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये आपल्या वडिलांसोबतच्या कटु नात्याविषयी मन मोकळं केलं.

शायनीने सांगितलं, "मी फक्त १६ वर्षांची असताना, माझे वडील मला वेश्या म्हणायचे. अहमदाबादमध्ये माझी प्रिंट शूट्स असायची, जे रात्री उशिरापर्यंत चालायची. प्रत्येक शूटला आई माझ्यासोबत असायची. पण घरी परतल्यानंतर ते कधीच विचारत नसत की, 'तू ठीक आहेस ना? सुरक्षित आहेस का?' उलट अश्लील बोलायचे आणि आईला दोष द्यायचे."

तिच्या मते, वडिलांची भाषा आणि वागणूक अत्यंत कठोर होती. पण याही सर्व वेदनांवर मात करत तिने घराची जबाबदारी उचलली आणि कुटुंबासाठी कमवायला सुरुवात केली. शायनीने असेही नमूद केले की, ती आणि तिचे वडील त्यांच्या मृत्यूपूर्वी दोन वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते.

२०१९ मध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान वडिलांचे निधन झाले. याबाबत बोलताना शायनी म्हणाली, "माफ केलं का?  काही गाठी सोडवल्या जात नाहीत. मी खूप काही शिकलं, पण आयुष्यात कधी कधी खूप कमकुवत वाटतं. कारण माझ्या आयुष्यात मला आधार देणारा ‘बाप’ नव्हता."

कामाच्या बाबतीत, शायनी शेवटची ‘पांड्या स्टोअर्स’ या मालिकेत दिसली होती, ज्यात तिने किंशुक महाजन यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार होते आणि शो ला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती.